logo

ट्रॅक्टर-दुचाकीची धडक; हिरडव येथील दाम्पत्य जखमी दुसरबीडनजीकची घटना : ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

इरफान शाह आयमा न्युज (बुलढाणा)
दुसरबीडपासून एक किमी अंतरावर असलेल्या गतिरोधकाजवळ ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला.
लोणार तालुक्यातील हिरडव येथील हॉटेल व्यावसायिक पार्श्वनाथ जैन हे पत्नीसह दुचाकीवर (एमएच २८ एडब्ल्यू २९७३) सावखेड तेजन येथे जात होते. दुसरबीडनजीकच्या नगरमाळ परिसरातून पुढे मेहकर ते सिंदखेडराजा मार्गावर दुसरबीडनजीक एका गतिरोधकाजवळ ते आले असता समोरून येणाऱ्या (एमएच २८ डी ९९८८) क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस चुकीच्या बाजूने येत धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पार्श्वनाथ जैन व त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी या दाम्पत्यास दुसरबीड येथील एका खासगी रुग्णालयात हलविले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना
जालना येथे हलविण्यात आले आहे.
अपघातामधील दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
अपघातग्रस्त ट्रॅक्टर हे मलकापूर पांग्रा येथील असून, चालक गजानन भुजंगराव उगले (४१) हा इंधन भरण्यासाठी नगरमाळावरील पेट्रोलपंपावर जात होता. या दरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी अपघात
झालेली दोन्ही वाहने आणि ट्रॅक्टरचालक गजानन भुजंगराव उगले यास किनगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामधील दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांच्या तर्फे अद्याप कोणीही किनगाव राजा पोलिसात तक्रार दिलेली नाही.

3
87 views